शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची धाव बुवा-महाराजांकडे

By admin | Updated: February 18, 2017 03:00 IST

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून, त्यात प्रस्थापित गावपुढाऱ्यांची

लोणी काळभोर : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून, त्यात प्रस्थापित गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश ठिकाणी निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने आपणच निवडून यावे म्हणून उमेदवारांनी चक्क बुवा, मांत्रिक, देवरूषी, महाराज यांच्याकडेही आशीर्वादासाठी धाव घेतली आहे. त्यामुळे बाजारात नारळ, लिंबू - मिरची, गंडे - दोरे, अंगारा - धुपारा यांना भाव आल्याची तालुक्यात चर्चा आहे. अत्यंत गुप्तपणे अंगारा - धुपारा, लिंबू - मिरची, टाचणी व बिबव्यासह कुलदेवतेचा भंडारा उधळून निवडणूकीतील विजय निश्चितीसाठी देव - देवतांना कौल लावण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. केवळ सत्ता मिळावी या हव्यासापोटी अंधश्रध्देच्या मागे जाण्यात पुढारीही मागे नाहीत असे दिसून येत आहे. विजयाची निश्चिती करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब सुरू आहे. सामिष जेवणावळींसह विविध प्रकारे साऱ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हॉटेल, ढाबे, केटरिंगवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला असल्याने गांवागावांतील वातावरण ढवळून निघाले आहे. (वार्ताहर)आळीनिहाय जेवणावळी!४इतर वेळी ढुंकूनही न पाहणारे राजकीय पुढारी आता मात्र दोन्ही हात जोडून वेळप्रसंगी साष्टांग दंडवत घालून ‘नमस्कार या वेळी लक्ष असू द्या’ असे म्हणत विनवण्या करून साद घालताना दिसत आहेत.४मतदार नाराज राहू नये याकरिता आळीनिहाय जेवणावळींचे आयोजन करण्यात येत असून, आग्रहाचे आमंत्रण देऊन मतदारराजाच्या आवडीचे खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत.