Pune | भांडणाची तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस ठाण्यातच केले गळ्यावर ब्लेडने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:02 IST2023-03-14T14:00:15+5:302023-03-14T14:02:09+5:30

दोघेजण किरकोळ भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते...

Came to report a fight, stabbed in the neck with a blade at the khed police station itself | Pune | भांडणाची तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस ठाण्यातच केले गळ्यावर ब्लेडने वार

Pune | भांडणाची तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस ठाण्यातच केले गळ्यावर ब्लेडने वार

राजगुरूनगर (पुणे) : खेड पोलिस ठाण्यात दोन तक्रारदारांमध्ये वाद होऊन पोलिस ठाण्यात एकाच्या गळ्यावर गंभीर वार करण्यात आले असल्याची घटना दि. १४ रोजी घडली आहे. क्षितिज बाबाजी दांडगे (रा. दोंदे ता. खेड ) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दोंदे (ता. खेड ) येथे दोन कुटुंबामध्ये वाद होऊन सोमवार (दि. १४ ) हाणामारी झाली होती. वैभव गोविंद बोऱ्हाडे ( रा. दोंदे ता खेड ) याच्या पत्नीला मारहाण झाल्यामुळे ते तक्रार देण्यासाठी खेड पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान क्षितिज बाबाजी दांडगे हा तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी दोंघा तक्रारदारांना एकत्र बसवून ठेवले होते.

दरम्यान झालेल्या प्रकराणावरून दोंघामध्ये पुन्हा पोलिस ठाण्यात बाचाबाची झाली. राग अनावर होऊन वैभव बोऱ्हाडे यांने खिशातील ब्लेड काढून दांडगे यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात दांडगे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Came to report a fight, stabbed in the neck with a blade at the khed police station itself