खायला देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीला घरात बोलावून अश्लील कृत्य; तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 14:25 IST2022-02-19T14:22:48+5:302022-02-19T14:25:50+5:30

गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ या कालावधीत हा प्रकार घडला...

calling 9 year old girl home molestation youth was arrested pune crime | खायला देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीला घरात बोलावून अश्लील कृत्य; तरुणाला अटक

खायला देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीला घरात बोलावून अश्लील कृत्य; तरुणाला अटक

पिंपरी : खायला देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीला घरात बोलावले. त्यानंतर अश्लील कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली. मोशी येथे गुरुवारी (दि. १७) रात्री आठ ते साडेआठ या कालावधीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी ३५ वर्षीय पुरुषाने शुक्रवारी (दि. १८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नंदलाल अमिरचंद कुशवाह (वय ३७, रा. मोशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या नऊ वर्षीय पुतणीला खायला देण्याच्या बहाण्याने आरोपीने घरामध्ये बोलावले. त्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून अश्लील कृत्य केले. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन, तिचा विनयभंग झाला. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. जाधव तपास करीत आहेत.

Web Title: calling 9 year old girl home molestation youth was arrested pune crime