मैत्रिणीमार्फत तरुणीला बोलावले; मैत्रीस नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण

By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2024 10:07 IST2024-03-06T10:07:00+5:302024-03-06T10:07:54+5:30

भांडण मिटवण्यासाठी तरुणीला बोलावल्यावर तिने पुन्हा मैत्री करण्यास नकार दिल्याने तरुणाने मारहाण करून विनयभंग केला

Called the young woman through a friend A young woman was brutally beaten for refusing friendship | मैत्रिणीमार्फत तरुणीला बोलावले; मैत्रीस नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण

मैत्रिणीमार्फत तरुणीला बोलावले; मैत्रीस नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण

पुणे : मैत्रिणीमार्फत तरुणीला भांडण मिटविण्यासाठी बोलावून तिला मारहाण करुन  तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्रीस नकार दिल्याच्या कारणातून तरुणाने तिला मारहाण केली.

याप्रकरणी, प्रशांत सुडके (वय.22) या तरुणाच्या विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वडगांवशेरी येथील 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास विमाननगर परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला विरोध केला. दरम्यान तरुणीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. तिच्या वडिलांनी याबाबत आरोपीला जाब विचारला असता, त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीच्या एका मैत्रिणीला फोन करून वाद मिटवायचे असल्याचे सांगितले. विमानगर परिसरात बोलावून घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीला शिवीगाळ केली. डोक्याचे केस पकडून हाताने मारहाण केली. तरुणीने विरोध केला असता, मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपीने केले. या प्रकारात तरुणीच्या कानातील सोन्याचा झुमका पडून गहाण
झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत.

Web Title: Called the young woman through a friend A young woman was brutally beaten for refusing friendship