पिंपरीत व्यापाऱ्याचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 14:12 IST2018-05-02T14:02:21+5:302018-05-02T14:12:40+5:30

साबण उत्पादन आणि विक्री करणाऱ्या पिंपरीतील व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Businessman murdered in pimpri | पिंपरीत व्यापाऱ्याचा गळा आवळून खून

पिंपरीत व्यापाऱ्याचा गळा आवळून खून

ठळक मुद्देप्राथमिक तपासात गळा आवळून खून केला असल्याचे निदर्शनास

पिंपरी : साबण उत्पादन आणि विक्री करणाऱ्या पिंपरीतील व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी ( दि . २ मे ) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१, रा. पिंपरी मार्केट, डी ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे  नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हिंगोरानी यांचा साबणाचा व्यवसाय हा पिंपरीमध्ये होता. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने राहत्या घरात व्यापारी प्रदीप यांचा गळा आवळून हत्या केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास मोलकरीण घरी आल्यानंतर घटना उघडकीस आली. हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मयत व्यापारी प्रदीप हे वृद्ध आई सोबत राहत होते. तसेच त्याचा विवाह झाला नव्हता. रात्री उशिरा प्रदीप यांनीच दरवाजा उघडला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Businessman murdered in pimpri