बारामतीत चोरींचे सत्र सुरूच, सातव चौकात सात लाखांची घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 20:25 IST2023-08-17T20:20:41+5:302023-08-17T20:25:02+5:30

सुमारे ६ लाख ४० हजार रुपयांचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम असा ६ लाख ९० हजारांचा माल लंपास केला आहे...

Burglary season continues in Baramati, house burglary worth seven lakhs in Satav Chowk | बारामतीत चोरींचे सत्र सुरूच, सातव चौकात सात लाखांची घरफोडी

बारामतीत चोरींचे सत्र सुरूच, सातव चौकात सात लाखांची घरफोडी

बारामती : बारामती शहरातील तांदूळवाडी रस्त्यावरील सातव चौकातील रम्यनगरी अपार्टमेंटमधील सदनिकेत अज्ञात व्यक्तीने घरफोडी केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामध्ये सुमारे ६ लाख ४० हजार रुपयांचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम असा ६ लाख ९० हजारांचा माल लंपास केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत चरणसिंग किसन चव्हाण यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे येथे कुटुंबासह राहतात. दि. १४ ऑगस्टला ते बहिणीला भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. १५ ऑगस्टला ते रात्री सव्वा दहा वाजता बारामतीत पोहोचले. यावेळी त्यांना घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा कापलेला दिसला. आतील लाकडी दरवाजाचा कोयंडाही कापून बाजूला टाकण्यात आला होता. आतमध्ये जात त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना बेडरूममधील सामान सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेले दिसले. लोखंडी कपाट उघडे होते. कपाटातील लॉकर कशाने तरी उचकटलेला दिसले. त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम जागेवर नसल्याचे दिसून आले.

या घटनेत १ लाख रुपयांच्या अर्ध्या तोळ्याच्या पिळ्याच्या पाच अंगठ्या, एक लाख रुपयांचे अडीच तोळ्यांच्या दोन सोन्याच्या साखळ्या, ६० हजार रुपयांचे दीड तोळ्याचे नेकलेस, १ लाख ४० हजार रुपयांचे ३.५ तोळे वजनाचे मिनी गंठण, १ लाख ६० हजार रुपयांचे ४ तोळ्यांचे गळ्यातील गंठण, ४० हजार रुपयांचे एक तोळ्याचे सोन्याचे झुमके, ४० हजार रुपयांचे एक तोळ्याचे गळ्यातील बदाम व ५० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे.

Web Title: Burglary season continues in Baramati, house burglary worth seven lakhs in Satav Chowk