बैलगाडा आंदोलन प्रकरण; आढळराव पाटील, महेश लांडगे आजी माजी आमदारांना न्यायालयाचे अटक वॉरट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:00 IST2025-08-14T19:00:12+5:302025-08-14T19:00:51+5:30
मध्यंतरी शासनाने बैलगाडा मालक व आंदोलन कर्त्यावरील गुन्हे मागे घेणार म्हणून जाहीर केले होते. परंतु हा शासनाचा निर्णय न्यायालयापर्यंत पोहोचला नाही - दिलीप मोहिते पाटील

बैलगाडा आंदोलन प्रकरण; आढळराव पाटील, महेश लांडगे आजी माजी आमदारांना न्यायालयाचे अटक वॉरट
राजगुरुनगर: २०१७ मध्ये चाकण मध्ये बैलगाडा आंदोलन प्रकरणी ३२ जणांवर गुन्हे दाखल केले. न्यायालयात उपस्थित राहत नसल्यामुळे आजी माजी आमदार व बैलगाडा मालक यांना अटक वॉरट जारी करण्यात आले होते. दि. १४ रोजी सर्वजण अटक वॉरट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते.
चाकण येथे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले होते. या आंदोलनात चाकण चौकात रास्तारोको करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलिप मोहिते, बाळा भेगडे, राजेश जवळेकर यांच्यासह बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल केले होते. ते न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक वॉरट जारी केले होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलिप मोहिते बाळा भेगडे यांच्यासह बैलगाडा मालक यावेळी न्यायालयात अटक वॉरट रद्द करण्यासाठी आले होते. चाकण येथे सर्वपक्षीय आंदोलन बैलगाडे सुरू करावे या संदर्भात मोठे आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांनी माझ्यासह, सर्वपक्षीय पुढार्यांवर तसेच बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल केले होते. गेले सात आठ वर्ष याकडे दुर्लक्ष झाले. मध्यंतरी शासनाने बैलगाडा मालक व आंदोलन कर्त्यावरील गुन्हे मागे घेणार म्हणून जाहीर केले होते. परंतु हा शासनाचा निर्णय न्यायालयापर्यंत पोहोचला नाही. न्यायालयात अजूनही याबाबत खटला सुरू आहे. न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यामुळे आज न्यायालयात यावे लागले. असे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी बोलताना सांगितले.