शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षण’चे अंदाजपत्रक स्थायीकडे

By admin | Updated: September 4, 2015 02:20 IST

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने, ३७ शाळा महापालिकेला बंद कराव्या लागणार आहेत; मात्र शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक फुगतच चालले आहे

पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने, ३७ शाळा महापालिकेला बंद कराव्या लागणार आहेत; मात्र शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक फुगतच चालले आहे. यंदा शिक्षण मंडळाने ३३४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीला सादर केले आहे. मागील वर्षी शिक्षण मंडळाच्या २८५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली होती. खरेदीमध्ये सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारामुळे सतत वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण मंडळाचे आर्थिक अधिकार काढून घेऊन ते महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षी महापालिकेकडूनच शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा शिक्षण मंडळाला आर्थिक अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष बाबा धुमाळ यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने शिक्षण मंडळ पुन्हा चर्चेत आले.शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये बहुतांश गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता शिक्षण मंडळाकडून त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, गणवेश मोफत उपलब्ध करून दिला जातो. शिक्षण मंडळाच्या ३०० शाळांमध्ये १ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या खरेदीचे मोठे टेंडर काढले जाते. ही खरेदी करताना मोठ्या दराने करून मोठे गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळाची प्रतिमा अत्यंत डागाळली गेली आहे.स्थायी समितीने मागील वर्षी शिक्षण मंडळाच्या २८५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती, यंदा त्यामध्ये ५० कोटींची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत खर्च, शैक्षणिक खर्च, सहली आणि कार्यक्रमांचे आयोजन यांचा समावेश आहे. शिक्षण मंडळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारते आहे का, याचा आढावा घेण्याबाबत कोणतीच यंत्रणा शिक्षण मंडळाकडे उपलब्ध नाही. स्थायी समिती या खर्चाला सरसकट मान्यता देते की त्यामध्ये काटछाट सुचविते हे येत्या मंगळवारी बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे.