तळेगावात रॉड व कोयत्याने वार करून तरूणाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 09:43 IST2022-11-07T09:42:39+5:302022-11-07T09:43:23+5:30

ही घटना तळेगाव दाभाडे येथील तुकारामनगर येथे घडली...

Brutal murder of a youth by stabbing rod and a coyote in Talegaon pune crime | तळेगावात रॉड व कोयत्याने वार करून तरूणाचा निर्घृण खून

तळेगावात रॉड व कोयत्याने वार करून तरूणाचा निर्घृण खून

तळेगाव दाभाडे (पुणे) : जुन्या भांडणाच्या कारणावरून रॉड व कोयत्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना तळेगाव दाभाडे येथील तुकारामनगर येथे रविवारी रात्री ९.३०ते १०.३०च्या दरम्यान घडली. प्रणव अनिल मांडेकर (वय १९, रा. इंदोरी, ता.मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

या संदर्भात मृताचे वडील अनिल ज्ञानेश्वर मांडेकर (वय ४२, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून जवळपास २० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक  पोलीस आयुक्त पद्माकर घणवट, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रणव मांडेकर यांच्या खून प्रकरणामुळे तळेगाव शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा शहरात गॅंगवार उफाळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Brutal murder of a youth by stabbing rod and a coyote in Talegaon pune crime