Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात अल्पवयीन तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:11 IST2023-04-05T18:08:35+5:302023-04-05T18:11:01+5:30
बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली...

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात अल्पवयीन तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून
- किरण शिंदे
पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दी एका अल्पवयीन तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. डोक्यात दगडाने तसेच कोयत्याने वार करून हा खून करण्यात आला आहे. तन्मय इंगळे (17) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
मयत आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. आज दुपारच्या सुमारास हे सर्व मांगडेवाडी परिसरातील एका निर्जन ठिकाणी एकत्र आले. त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर इतर अल्पवयीन आरोपींनी डोक्यात दगडाने आणि कोयत्याने वार करून तन्मय इंगळेचा खून केला. या खून प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.