बारामती तालुक्यात कुऱ्हाडीने वार करत सख्ख्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:56 IST2022-08-13T14:55:51+5:302022-08-13T14:56:57+5:30

रस्त्यावर लाकडे का टाकले, असे विचारले असता...

brother killed by ax stabbing in Baramati taluka pune crime news | बारामती तालुक्यात कुऱ्हाडीने वार करत सख्ख्या भावाचा खून

बारामती तालुक्यात कुऱ्हाडीने वार करत सख्ख्या भावाचा खून

मोरगाव (पुणे) बारामती तालुक्यातील मुर्टीनजीक मोढवे गावामध्ये सख्ख्या भावाचा खून केला असल्याची घटना घडली. शेतात जाण्याच्या  रस्त्यावर लाकडी ओंडके आडवे का टाकले अशी विचारणा केली असता   कुऱ्हाडीने गंभीर वार केले. पायावर वार झाल्याने जखमी होऊन तायाप्पा सोमा मोटे (वय ६०) यांचा मृत्यू झाला.

मोढवे गावामध्ये शेतात जाण्याच्या रस्त्यावर लाकडी ओंडके आडवे का टाकले अशी विचारणा केली असता धाकट्या भावाने थोरल्या भावाच खून केला. ही घटना १२ ऑगस्टला दुपारी २ नंतर घडली. याबाबत तक्रार लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगांव निंबाळकर येथे दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मयत तायाप्पा सोमा मोटे यांनी रामा सोमा मोटे यांने शेतात जाणाऱ्या वाटेवर आडवे ओंडके का टाकले, असे विचारले होते. या कारणावरून फिर्यादीचे सासरे तायाप्पा यांना आरोपीने शिवीगाळ, दमदाटी करत या रस्त्याने जायचे नाही, तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणाला. नंतर ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने फिर्यादीचे सासरे तायप्पा मोटे यांच्या हातातील कुऱ्हाड घेतली. यादरम्यान मोटे खाली पडले. आरोपीने कुऱ्हाड तायाप्पा यांच्या डोक्यात मारत असताना ती  तायप्पा मोठे यांनी  हुकवल्याने डोक्यात न लागता डाव्या पायाच्या पिंडरीवर लागून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू पावले असल्याची घटना घडली.

सदर ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे व बारामती डीएसपी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पुढील तपास एपीआय सोमनाथ लांडे हे करत आहेत.

Web Title: brother killed by ax stabbing in Baramati taluka pune crime news