पुणे, पिंपरी महापालिकांमध्ये नेतेमंडळी, कार्यकर्त्यांकडून मास्क अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 14:13 IST2021-03-05T14:01:48+5:302021-03-05T14:13:14+5:30
सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे अधिकारी आता या नेते मंडळींवर कारवाई करणार का हाच प्रश्न उपस्थित...

पुणे, पिंपरी महापालिकांमध्ये नेतेमंडळी, कार्यकर्त्यांकडून मास्क अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
पुणे : एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर मास्क, सोशल डिस्टनसिंगसाठी सक्ती केली जात आहे तसेच निर्बंध देखील कडक करण्यात येत आहे. मात्र, दोन्ही महापालिकांमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला पहायला मिळाला.
महापालिकांमध्ये विजयी पक्षाचे नेतेमंडळी सेलिब्रेशन करताना चक्क मास्क काढुन फोटोसेशन करताना दिसले. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे अधिकारी आता या नेते मंडळींवर कारवाई करणार का हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेची शिक्षण समिती आणि पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणुक आज सकाळी पार पडली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पूर्ण फज्जा उडालेला पहायला मिळाला. सेलिब्रेशनसाठी जमलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक कोणत्याही पाळले नाहीच शिवाय फोटोसेशन करताना मास्कही देखील काढलेले बघायला मिळाले. याला उपस्थित भाजप नगरसेवक , नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सभागृह नेतेही अपवाद ठरले नाहीत