घरात घुसून दाम्पत्याला केली मारहाण; जबरदस्तीने काढून घेतले पाच हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:02 IST2021-03-31T15:01:33+5:302021-03-31T15:02:11+5:30

पिंपरीत दहा जणांवर दरोड्याचा गुन्हा, एकाला अटक

Broke into the house and beat the couple; Five thousand rupees forcibly taken away | घरात घुसून दाम्पत्याला केली मारहाण; जबरदस्तीने काढून घेतले पाच हजार रुपये

घरात घुसून दाम्पत्याला केली मारहाण; जबरदस्तीने काढून घेतले पाच हजार रुपये

ठळक मुद्देदोन्ही प्रकरणात गुन्हेगारांकडून धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस

पिंपरी: घरात घुसून दाम्पत्याला मारहाण करून जबरदस्तीने पाच हजार रुपयांची रक्कम काढून घातल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी शहरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून १० जणांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील रिव्हर रोड व मिलिंदनगर येथे सोमवारी हा प्रकार घडला.  

पहिल्या प्रकरणात मायकल ऊर्फ मॉन्टी राजेश डिसोझा (वय २९, रा. , पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सनी सौदाई (वय ३०), सचिन सौदाई (वय ३७), अजय टाक (वय २२), जतीन मेवाती (वय २१), अनिल पिवाल ऊर्फ बाबा (वय २७), तरुण टाक (वय २२), तौसिफ सय्यद (वय २१, सर्व रा. पिंपरी) व तीन अनोळखी इसम, अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी सनी सौदाई याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकल त्यांच्या मुलाला खाऊ घेऊन रिव्हर रोड येथून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या जवळ आले. त्यांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मायकल यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यांना सोडवायला आलेल्या त्यांच्या आईला शिवीगाळ दमदाटी केली. 

दुस-या प्रकरणात संजय शंकर कांबळे (वय ५७, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. सनी सौदाई (वय ३०, रा. पिंपरी), अजय टाक (वय २२), साहिल (वय २२, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), जतीन मेवाती (वय २५), बाबा बिडलानी (वय २६, दोन्ही रा. पिंपरी) व इतर चार ते पाच अनोळखी इसम, अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी सनी सौदाई याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांचा मुलगा स्वप्नील याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी कांबळे यांच्या घराचा दरवाजा तोडला. घरात जबरदस्तीने घुसून त्यांना व त्यांच्या पत्नी यशोदा यांना हाताने व लाथांनी मारहाण केली. तू घाट के पास चल, आज तुझे खतम ही कर देते है, अशी धमकीही मुलाला दिली. 


 

Web Title: Broke into the house and beat the couple; Five thousand rupees forcibly taken away