शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर मृत्यूचा पूल, राजगुरुनगर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:31 IST

पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत.

दावडी : पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत. त्यामुळे पुलाच्या डांबरीकरणावरून एखादा इंचही तुमची गाडी घसरली, तर ती थेट पंधरा-वीस फूट खोल ओढ्यात जाऊन पडणार आहे. त्यामुळे हा पूल म्हणजे जणू पुणे-नाशिक महामार्गावरून मृत्यूला जोडणाराच पूल झाला आहे.पुणे-नाशिक महामार्ग हा राजगुरुनगर शहरातून जातो. राजगुरुनगरात येताच एका ओढ्यावर ब्रिटिशकालीन पूल लागतो. तो पूल ओलांडण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात एक पूल बांधला होता. हा पूल सुरू होण्याआधी सुमारे शंभर मीटरवरून रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी रेलिंग लावण्यात आले होते. मात्र, कालांतराने या पुलाची व रेलिंगजी डागडुजी झालीच नाही.त्यामुळे काही किरकोळ अपघातांत साईडचे लोखंडी रेलिंग तुटले आणि ते घसरत-घसरत थेट ओढ्यावर लोंबकळत आहे. इतकेच नव्हे, तर पुलाजवळील रस्ता खचून गेल्याने वाहने एक इंच जरी रस्त्यावरून खाली आल्यास थेट ओढ्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याची डागडुजी करण्याऐवजी मातीचा भराव टाकला आहे; त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी घसरडा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती आहे.त्यामुळे हा पूल ओलांडताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. केवळ चारचाकीच नव्हे, तर दुचाकीस्वारांचा जीवही या धोकादायक पुलामुळे येथून जाणे अत्यंत कठीण झाले आहे.अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता झाला अरुंदपूल सुरू होण्याआधी रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे; मात्र त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जाते. या रस्त्यावर दुतर्फा विविध दुकानांची गर्दी असल्यामुळे दुकानात खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेलाच वाहन पार्क करून दुकानात शॉपिंग करतात. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या पार्किंगमुळे पूल सुरू होण्याच्या आधीच रस्ता अरुंद होतो आणि वाहतुकीची कोंडी सुरू होते.पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाची जशी अवस्था आहे, तशीच अवस्था येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगतच्या पुलाची झाली आहे. त्यामुळे येथील पूल आणि साईडचे रेलिंग त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशा आहेत त्रुटीइतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाही. रस्त्यावर कुठेही साईडला व मध्यभागी पांढरे पट्टे मारलेले नाहीत; त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या रुंदीचा आणि सेंटरपॉइंटचा अंदाज येत नाही.रात्रीच्या वेळी तर रस्त्याची रुंदी कुठे संपते, याचा किंचितही अंदाज येत नाही. पूल सुरू झाल्यावर त्याच्या कठड्यांना रिफ्लेक्टरही लाण्यात आले नाहीत; त्यामुळे या पुलावरून वाहन चालविणे म्हणजे एक दिव्यच मानले जाते.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेक वेळा येथे वाहतूक जाम होते. वाहनांच्या कधीकधी रांगा लागतात; त्यामुळे काही वाहनचालक गाडी पुढे नेण्याच्या नादात डांबरी रस्त्यावरून खाली उतरतात व पूल जवळ आल्यावर मात्र तेथे माती खचली असल्याने पुलाजवळ येऊन फसतात.येथे अनेक वेळा अपघात झाले. विशेषत: रात्रीच्या वेळी वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर तर नवख्या वाहनचालकांचा अपघात हा जणू ठरलेलाच आहे.

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिक