चक्क आजारी आरोपीलाच मागितली २० हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 00:45 IST2019-02-17T00:45:22+5:302019-02-17T00:45:41+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे़

A bribe of Rs 20,000 was sought by a well-known accused | चक्क आजारी आरोपीलाच मागितली २० हजारांची लाच

चक्क आजारी आरोपीलाच मागितली २० हजारांची लाच

पुणे : तुरुंगात आपल्या ओळखीच्या असलेल्या व्यक्तीला भेटण्याकरिता नातेवाईक पोलिसांना कायमच ‘‘चिरीमिरी’’ देत असल्याचे बोलले जाते. ज्या व्यक्तीला भेटायला नातेवाईक आले आहेत त्यांना बोलण्याकरिता, भेटीकरिता वेळ मिळावा, यासाठीदेखील पोलीस पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार नागरिक करीत असतात. मात्र आता चक्क आजारी असल्याने ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असलेल्या मुलाला भेटू देण्यासाठी दोघा पोलिसांनी वडिलांकडे चक्क २० हजार रुपयांची लाच मागितली़ या घटनेमुळे पोलीस प्रशासनासमोर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे़ आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तुुरुंगात उपोषण सुरू केले आहे़ त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे़ तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ त्यांच्या बंदोबस्तासाठी स्वप्निल भद्रे आणि अनोश गायकवाड यांची नेमणूक केली आहे़ त्याच्या वडिलांनी मुलाला भेटू देण्यासाठी विनंती केली़ तेव्हा त्यांनी मुलाला भेटायचे असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली़

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री सापळा रचून या दोघा पोलिसांना रंगेहाथ पकडले़ स्वप्निल भीमराव भद्रे (वय ३०, रा़ विश्रांतवाडी पोलीस लाईन), अनोश आॅगस्टिन गायकवाड (वय २४, रा़ कनक अपार्टमेंट, दौंड) अशी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस शिपायांची नावे आहेत़

Web Title: A bribe of Rs 20,000 was sought by a well-known accused