शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यवतच्या ओढ्याचा श्वास कोंडलेलाच

By admin | Updated: July 9, 2015 23:22 IST

महामार्गाच्या पुलाखालील राडारोडा काढण्याचे काम परत एकदा थांबल्याने पालखी मुक्काम असणाऱ्या श्री काळभैरवनाथ मंदिराजवळच सांडपाण्याचा बंधारा तयार झाला आहे.

यवत : येथील ओढ्याचा श्वास अद्यापही कोंडलेलाच आहे. महामार्गाच्या पुलाखालील राडारोडा काढण्याचे काम परत एकदा थांबल्याने पालखी मुक्काम असणाऱ्या श्री काळभैरवनाथ मंदिराजवळच सांडपाण्याचा बंधारा तयार झाला आहे.सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साठून राहिले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवार दि.१३ जुलै रोजी यवत मुक्कामी येणार आहे. पालखी सोहळा मुकामी येत असल्याने गावातील पूर्व तयारीचे काम जोरात सुरु आहे.मात्र, पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना ओढ्यावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या खालील राडारोडा तसाच पडून राहिल्याने मागील पावसाळ्यात पुराला तोंड देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. महामार्गाच्या बाजुला असलेली अनेक दुकाने व घरे तसेच आनंदग्राम सोसायटी मध्येदेखील पाणी घुसले होते. यात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आमदार राहुल कुल यांनी महामार्ग प्राधिकरणाचे पंदारकर यांच्याकडे याची तक्रार करुन ओढ्यातील राडा रोडा साफ करण्याची मागणी केली होती. मागील वर्षभरात चार ते पाच वेळा ओढा साफ करण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले. मात्र काम अर्धवट स्थितीत बंद केले. पालखी सोहळा मुक्कामी येण्याच्या अगोदर काही दिवस काम परत सुरु करण्यात आले होते.पोकलेन मशीनच्या साह्याने काम सुरु झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, गावातील विघ्नसंतोषी पुढाऱ्याने काम करणाऱ्या ठेकेदाराला दमबाजी करुन काम बंद पाडले. ठेकेदाराला मारण्यासाठी तेथे काही जण गेल्याने काम बंद झाल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाचे पंदारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)ग्रामपंचायतीबरोबरच महसूल विभागाचे दुर्लक्ष प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी यवतमधील ओढ्याची पाहणी केली होती. त्यानंतर ओढ्यातील मोजणी करुण ओढ्याचे पात्र रुंद करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचे नंतर काय झाले याची माहिती मिळाली नाही. ग्रामपंचायतीने अतिक्रमणांकड़े दुर्लक्ष केले आहे. ओढ्याचे पात्र अरुंद झाल्याने भविष्यात वारंवार पुराने नुकसानीची शक्यता आहे.