शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : तळोजा कारागृह ते कोथरूड ३०० वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:58 IST

अजित पवारांनी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांवर ओढवली नामुष्की..

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर ३०० वाहनांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढत प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर पुणेपोलिसांनी एकामागोमाग गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. या धडक कारवाईनंतर सध्या मारणे व त्याच्या साथीदारांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. आता गजानन मारणे फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

कुख्यात गजानन मारणे याची २ खुनाच्या खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्यांची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणुक काढली. त्यात शेकडो चारचाकी गाड्या सहभागी होत्या. गजानन मारणे याच्यावर तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वारजे, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

अजित पवारांनी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांवर ओढवली नामुष्की.. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर एका गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून निवडणूक निघते. ही बाब सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. अशा कोणत्याही स्वरूपात गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये. कारण त्यांचा आदर्श तरूण पिढी घेते. पोलिसांनी असे प्रकार अजिबात खपवून मी घेऊ नयेत. चोर आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस खात्याला सुनावले होते. नि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गजानन मारणे फरार झाल्यामुळे बापूने पोलिसांची मोठी कोंडी झाली आहे. 

कोण आहे गजानन मारणे?पप्पु गावडे आणि अमोल बधे या खून प्रकरणात २०१४ मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलविले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले हाेते.गजानन मारणे हा सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव जमला होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाला. 

टोल न भरता ताफा पुढे.... 

एरवी टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनांना सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्यांचे दोन्हीनाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणुक सुरु होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन -तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहचला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुखState Governmentराज्य सरकारCrime Newsगुन्हेगारी