शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 14:42 IST

अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील वस्तू चोरल्या

वरवंड : ता- दौंड  वरवंड येथील बारवकर वस्ती येथे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील ७२ हजार रोख रक्कम व मौल्यवान सोने-चांदीचा एकूण ८  लाख ६ हजार ५०१ रुपयांचा ऐवज चोरुन पसार झाल्याची घटना घडली आहे             महादेव ईश्वर जाधव (वय ६१, रा. वरवंड (बारवकर वस्ती कडेठाण रोड) यांच्या घरी सोमवारी  (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली. रविवारी आणि सोमवारी वरवंड येथील यात्रा होती. सोमवारी महादेव जाधव यांचा मुलगा एका रूमला कुलूप लावून यात्रेत तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तर घरातील रूममध्ये महादेव व त्यांची पत्नी व मुलगी घरातील एका रूमला आतून कडी लावून झोपली. अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील रूममधील लोखंडी कपाट उघडून कपाटामधील  पर्समधील सोन्याचे दागिने व ७२ हजार रूपये रोख रक्कम तसेच शेजारीच असलेल्या दुसऱ्या लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये असणारे डब्यामधील चांदीच्या मूर्ती, किचन रूममधील सोन्याचा गंठण व मंगळसुत्र असा एकूण आठ लाख सहा हजार पाचशे रुपये चोरट्याने चोरून नेला.  तसेच वरवंड गावातील कैलास नानासो शितोळे यांचेही घरी चोरी केली. 

महादेव जाधव यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यात्रे दिवशीच चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी यवत पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी व पुढील तपास  पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडSocialसामाजिकThiefचोरHomeसुंदर गृहनियोजनMONEYपैसाGoldसोनं