VIDEO: 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' पुस्तक प्रकाशन; बालगंधर्वला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 06:18 PM2019-08-13T18:18:09+5:302019-08-13T18:37:21+5:30

या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे. 

'Brahminists bombed, Muslims hanged' book publication in pune | VIDEO: 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' पुस्तक प्रकाशन; बालगंधर्वला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

VIDEO: 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' पुस्तक प्रकाशन; बालगंधर्वला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Next

पुणे : 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' या एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला आहे.

'हु किल्ड करकरे' हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांचे नवीन पुस्तक  'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत महासंघाच्या कार्यकर्त्यानी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा निषेध केला.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. नागरिकांना कार्यक्रमाला पाण्याची बाटली घेऊन जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्तिथ होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Brahminists bombed, Muslims hanged' book publication in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app