मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:09 AM2023-08-28T10:09:22+5:302023-08-28T10:09:34+5:30

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपाहारगृहातील व्यवस्थापकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल

Bottles smashed on the head of a businessman who came to eat with his girlfriend at the hotel | मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या

मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या

googlenewsNext

पुणे: हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत जेवण करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाचा बिलावरून वाद झाल्याने त्याला हॉटेलमधील कामगारांनी बेदम मारहाण केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी व्यवस्थापक प्रशांत जामेकर सामल (३८, रा. घुले वस्ती, उंड्री), कामगार मौसम कमानसिंग कुंवर (२७, रा. होले वस्ती, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी हाॅटेलमधील दोन - तीन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हुजेफा मुस्तफा अत्तारवाला (३८, रा. गंगा फ्लाेरन्टिना, एनआयबीएम रस्ता) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अत्तारवाला व्यावसायिक आहेत. अत्तारवाला आणि त्यांची डाॅक्टर मैत्रीण एनआयबीएम रस्त्यावरील स्पाईस फॅक्टरी हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर आकारण्यात आलेल्या बिलाबाबत अत्तारवाला यांनी कामगाराकडे विचारणा केली. या कारणावरून उपाहारगृहातील व्यवस्थापक सामल याने अत्तारवाला यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. संपूर्ण बिल भरल्याशिवाय उपाहारगृहातून बाहेर पडू देणार नाही, असे सामलने त्यांना सांगितले. त्यानंतर सामल, कामगार कुंवर आणि साथीदारांनी अत्तारवाला यांच्या डोक्यात बाटली फोडली. काचेची बाटली डोक्यात मारल्याने अत्तारवाला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अत्तारवाला यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपाहारगृहातील व्यवस्थापकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय वगरे करत आहेत.

Web Title: Bottles smashed on the head of a businessman who came to eat with his girlfriend at the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.