बारामती -भिगवण रोडवर ट्रक आणि ट्रॅक्टर जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 22:15 IST2025-12-07T22:15:07+5:302025-12-07T22:15:20+5:30
बारामती - भिगवण रोडवरील दोन्ही वाहनांना आग लागून वाहने जळून खाक झाली.

बारामती -भिगवण रोडवर ट्रक आणि ट्रॅक्टर जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू
Bhigwan Accident: बारामती - भिगवण रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक आणि ऊस खाली करून माघारी चाललेला ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात होवून दोन्ही वाहनांना आग लागून वाहने जळून खाक झाली यामध्ये ट्रॅकर चालकाचा आगीत जळून जागीच मृत्यू झाला.
या अपघातात ट्रॅक्टर चालक अमोल राजू कुराडे (रा. नातेपुते ता. माळशिरस जि.सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. भिगवण बारामती रोडवर पिंपळे पाटी येथे ऊसाचा मोकळा ट्रॅक्टर व ऊसाचा ट्रक नं.(एम.एच.११ एल १३४१) याचेमध्ये अपघात होऊन ट्रॅक्टर व ट्रक दोन्ही वाहनाने पेट घेतला होता अपघाताची माहिती होताच भिगवण स्टेशन स्टाफ, ग्रामस्थ आणि दोन फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझविण्यात आली या अपघातामुळे काहीकाळ रोड हा पूर्ण बंद झाला होता. पुढील कायदेशीर कारवाई करीत असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.