चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:19 IST2018-05-07T15:19:40+5:302018-05-07T15:19:40+5:30

चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली.

both person death in two wheeler accident at Chakan | चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

ठळक मुद्देअज्ञात वाहनावरील चालक फरार

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या परिसरात झगडे वस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला ठोस बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (दि. ७ ) रात्री बारा वाजून ५० मिनिटांनी झाला. या अपघातात अक्षय उर्फ बंटी संजय गारगोटे ( वय २४, रा. वाकी बु, ता.खेड, जि.पुणे ) व अंकुश कन्हैयालाल अगरवाल ( वय २१, रा. नेहरूचौक, राजगुरूनगर, ता.खेड, जि.पुणे ) हे दोन तरुण जागीच ठार झाले. हे दोघेही होंडा लिओ दुचाकी क्रमांक ( एमएच १४ जी व्ही ९६६३ ) वरून चाकणकडून खेड बाजूकडे जात असताना अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकीला ठोस देऊन जखमींना जागेवर सोडून खबर न देता पळून गेला. अमोल दामोदर गारगोटे ( वय २६, रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक, ता.खेड, जि.पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अज्ञात वाहन चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करत आहेत, अशी माहिती अनिल ढेकणे यांनी दिली. 

Web Title: both person death in two wheeler accident at Chakan