पुणे: अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण भावनिक आणि संवेदनशील बनलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता कोणताही विलंब न करता एकत्र यावं, अशी भूमिका राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली आहे. धनंजय महाडिक यांनी आज बारामतीत जाऊन अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
महाडिक म्हणाले, “जी घटना घडली आहे, ती कुणालाच सहन होणारी नाही. अशा परिस्थितीत जर आपण अजून विभागलेले राहिलो, तर त्यातून काही वेगळंच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेगळं काही होण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीने आता त्वरित एकत्र यावं,”
धनंजय महाडिक पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठी ताकद आहे. “आजच्या घडीला ४० आमदार अजितदादांचे आहेत, तर १० आमदार शरद पवार साहेबांचे आहेत. दोघांची मिळून खासदारांची संख्याही मोठी आहे. एकंदरीत पाहता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे आणि ती ताकद आता एकवटली पाहिजे,” असं ते म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या जागेवर कोण जबाबदारी सांभाळणार, या चर्चांवरही धनंजय महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला असंच वाटत आहे की, सुनेत्रताईंनी अजित पवारांची जागा घ्यावी. त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पाहिजे. जर संपूर्ण परिवाराची आणि तिन्ही पक्षांची संमती झाली, तर मीही त्याच विचारांचा आहे. सुनेत्रताईंना उपमुख्यमंत्री पद दिलं, तर त्या ही जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावू शकतील.”
याआधी सुनेत्रताई राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या, हे मान्य करताना त्यांनी पुढे सांगितलं, “मात्र राज्यसभेत त्या माझ्यासोबत असल्यामुळे त्यांच्या काम करण्याची पद्धत, त्यांचा स्वभाव मी अगदी जवळून पाहिला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्या समर्थपणे पेलू शकतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Web Summary : Following Ajit Pawar's death, Dhananjay Mahadik advocates for the NCP factions to unite, fearing further division. He suggests Sunetra Pawar for Deputy CM, believing she's capable. He emphasizes the collective strength of the party.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद, धनंजय महाडिक ने एनसीपी गुटों से एकजुट होने का आग्रह किया, विभाजन का डर जताया। उन्होंने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री बनाने का सुझाव दिया, विश्वास जताया कि वह सक्षम हैं। उन्होंने पार्टी की सामूहिक शक्ति पर जोर दिया।