आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; सरपंचांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:25 IST2025-10-24T13:25:00+5:302025-10-24T13:25:13+5:30
सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे हे गाव बारा वाड्या वस्त्यांमध्ये विखुरले आहे

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; सरपंचांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार
डिंभे: केंद्र सरकारकडून प्रदान करण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार २०२५ हा पुरस्कार बोरघर ता. आंबेगाव येथील लोकनियुक्त सरपंच विजय जंगले यांना नुकताच प्राप्त झाला आहे. तर आदिवासी भागातील ग्रामपंचायत असूनही मागील दोन वर्षात या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केल्यामुळे मानाचे समजले जाणारे आयएसओ मानांकनी या ग्रामपंचायतीने प्राप्त केले आहे. नुकताच दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून बोरघर ग्रामपंचायतीच्या या सर्वोच्च कामगिरीबद्दल परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
आंबेगाव तालुक्याचे आदिवासी भागातील बोरघर या ग्रामपंचायत नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. येथील लोकनियुक्त सरपंच विजय जंगले यांना मानाचा समजला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार २०२५ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे हे गांव बारा वाड्यावस्त्यांमध्ये विखुरले आहे. दोन वर्षांपूर्वी सरपंच पदावर निवडून आल्यानंतर त्यांनी गावातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले असून
काळभैरवनाथ ग्रामविकास संघ बोरघर यांच्या वतीने सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा नुकताच जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राजीव नंदकर अप्पर जिल्हाधिकारी यशोदा पुणे, भैरवनाथ ग्रामविकास संघाची अध्यक्ष राजू वाळकोळी, माझी विक्रीकर उपायुक्त डी.बी.घोडे मनपा अभियंता वनराज बांबळे, उपसरपंच राजू घोडे,सचिव विष्णू घोडे, पोलीस पाटील जमुना शेळके, सुभाष शेळके, सुधाकर खामकर, बबन बांबळे दगडू बांबळे, देवराम शेळके, दीपक वाळकोळी, काशिनाथ घोडे, ग्रामविस्तार अधिकारी संजय जोशी, शांताराम कोकणे ,रामदास कोकणे, जयसिंग भांबळे, जगन नंदकर, पिलाजी वाळकोळी, इत्यादी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.