'Bootcamp' attracts young people with gym time | जिमच्या जमान्यात तरुणांसह ज्येष्ठांना 'बूट कॅम्प' चे आकर्षण 
जिमच्या जमान्यात तरुणांसह ज्येष्ठांना 'बूट कॅम्प' चे आकर्षण 

ठळक मुद्देबुथ कॅम्पच्या नावाखाली जो काही एक भन्नाट उपक्रम

पुणे : आजकाल ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईमध्ये सुध्दा शारीरिक तंदुरुस्तीविषयी प्रचंड जागरुकता निर्माण झाली आहे.त्यामुळे रोजच्या धावपळीच्या जमान्यात देखील जो तो थोडातरी वेळ आपल्या शरीरासाठी देताना दिसतो. त्यात मग उठल्यापासन ते झोपेपर्यंतच्या सगळ्या बाबींवर तितक्यात कटाक्षाने नियोजनपूर्वक काम केले जाते. त्यात एनर्जेटिक ड्रिंकपासून नाश्ता,जेवण यांची सर्वतोपरी वेळेनुसार काळजी घेतली जाते. परंतु,हे सर्व असूनही छोट्या वयोगटातल्या मुलांपासून ते ज्येष्ठांमध्ये विशेषत: तरुणाईमध्ये जिमचे जबरदस्त आकर्षण आहे. पण अजिंक्य बेंद्रे नावाचा अवलिया तरुण जिमच्या व्यायामासोबत मोकळ्या  मैदानावर '' बूट कॅम्प '' च्या नावाखाली व्यायामाचे धडे गिरवत आहे. 


अजिंक्य ''बूट कॅम्प '' च्या नावाखाली जो काही एक भन्नाट उपक्रम राबवत आहे. त्यात जिमसोबतच नैसर्गिक वातावरणात केलेल्या व्यायामाचे महत्व याद्वारे पटवून देत आहे. या उफक्रमात त्याने तरुणांसह ज्येष्ठांना देखील सामावून घेतले आहे. जवळपास ४० ते ५० लोकांचा समूह व त्यांच्या आवश्यकतेनुसार जागा निश्चित करुन शहरातील वेगवेगळ्या भागात हा उपक्रम घेण्याचा त्याचा मानस आहे. या कामात प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार हे बॉडीवेट व्यायामप्रकार घेतले जातात. ज्यात विविध खेळ, कसरती यांच्या माध्यमातून सर्वप्रकारच्या व्यायाम प्रकारांचा आनंद खेळीमेळीच्या वातावरणात घेतले जातात. 

घरातील वयस्कर मंडळी लहानमुलांसह तरुण मंडळींना कॉम्प्युटर, मोबाईलवर खेळ खेळण्यापेक्षा मैदानात खेळायला जा असा सल्ला देताना नेहमी आढळतात. कारण त्यांच्या कणखर तब्येतीचे रहस्य काय असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यांच्याशी खुलेपणाने गप्पा मारताना ते सांगतात की, त्याकाळी घेतलेला पोटभर सकस आहार,चढाओढीने केलेला व्यायाम, मैदानी खेळ आणि उमेदीच्या काळात उपसलेले कष्ट यामुळेच ते आजदेखील ठणठणीत आहे. 

  अजिंक्य म्हणाला, गेली दहा वर्ष या क्षेत्रात काम करत आहे. तसेच मागील चार वर्षांपासून नव्याने बुथ कॅम्प ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. बंदिस्त वातावरणापेक्षा मोकळ््या हवेच्या ठिकाणी जर मैदानात व्यायामाच्या संधी सांघिक गटानुसार जर घेता आल्या तर हा प्रश्न मनात उभा राहिला आणि ही बुथ कॅम्प ही संकल्पना अस्तित्वात आली. परंतु, या उपक्रमाची सर्वात मोठी गरज होती ती मैदान.. ज्यांची संख्या आपल्याकडे एकतर खूपच मर्यादित आहे. मग शहरातील विविध वयोगटाच्या मंडळी एकत्रित येत माझ्याशी संपर्क करुन या बुथ कॅबची आयोजन केले जाते. त्यात शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम प्रकार हाताळले जातात. 

सायकलिंग, मॅरेथॉन, स्विमिंग, फुटबॉल, क्रिकेट, ट्रेकिंग यांसारखे खेळ खेळणारे लोक जेव्हा जिमच्या तासन्तास चालणाऱ्या वर्कआऊटला कंटाळून माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना पहिल्यांदा सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करतो. काही कालांतराने ती मंडळी '' बूट कॅम्प '' मध्ये इतक्या सहजतेने व आनंदाने केलेल्या व्यायामातून झालेले अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक, वैचारिक बदल अतिशय समाधानकारक असतो.  

Web Title: 'Bootcamp' attracts young people with gym time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.