पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 00:20 IST2020-02-08T00:13:34+5:302020-02-08T00:20:09+5:30
पुण्यात नामांकित हॉस्पिटल ओळखल्या जाणाऱ्या नोबेल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची मेल करण्यात आला आहे.

पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल
पुण्यात नामांकित हॉस्पिटल ओळखल्या जाणाऱ्या नोबेल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची मेल करण्यात आला आहे. हा मेल प्राप्त झाल्यानंतर लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र नोबेल हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी शोध मोहीम सुरू केलीय.
मिळालेल्या माहिती नुसार या मेल मुळे नोबेल हॉस्पिटल मधील वातावरण भयभीत झालंय. हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट पथक दाखल झाल आहे. तसेच पोलिस पथकाने बंदोबस्त कडक केला आहे. दहा लाख रुपये द्या अन्यथा नोबेल हॉस्पिटल बाँबने उडवून देऊ. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये 500 ग्राम RDX ठेवले आहे असा मजकूर मेल मध्ये असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. असा मेल आल्यानंतर लगेच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. हा मेल कोणी, कशासाठी केला याचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने गुप्तता पाळली आहे. कोणीही अधिकृत माहिती द्यायला तयार नसल्याचे दिसत आहे.