शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या नावावर बोगस बुकिंग

By admin | Updated: August 21, 2015 02:35 IST

एच.पी.चा गॅस सिलिंडरच घेत नसताना व संबंधित बँकेत खाते व आधार लिंक केले नसतानाही विश्रांतवाडी येथील दीपक रामचंद्र त्रिभुवन यांच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला गॅस सिलिंडरचे

सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेएच.पी.चा गॅस सिलिंडरच घेत नसताना व संबंधित बँकेत खाते व आधार लिंक केले नसतानाही विश्रांतवाडी येथील दीपक रामचंद्र त्रिभुवन यांच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला गॅस सिलिंडरचे अनुदान जमा होत आहे. तसेच कोथरूड येथे एकाच कुटुंबाला पाच महिन्यांत तब्बल तीस गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा आणि दर महिन्याला गॅस सिलिंडर घेतला नसतानाही परस्पर गॅस बुकिंग करून तो दुसऱ्यालाच विक्री करण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडकीस आले आहेत. ग्राहकांच्या नावावर बोगस बुकिंग करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या गॅस एजन्सींचा बोगस कारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे.शासनाने गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी गॅस सिलिंडर आधार व बँक लिंक करण्याचा निर्णय घेतला. यात गॅस कंपन्यांना देण्यात येणारे अनुदानाचे पैसे आता थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे गॅस सिलिंडरचा काळ्याबाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत झाली आहे. परंतु गॅस सिलिंडरचा काळाबाजार करण्यासाठी गॅस एजन्सींकडून अनेक नामी शक्कल शोधून काढल्या जात आहेत. यात थेट ग्राहकांच्या नावे बोगस बुकिंग करून घरगुती वापराचे गॅस सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना दुप्पट किमतीत विकण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. विश्रांतवाडी येथील त्रिभुवन यांच्या पत्नीच्या नावावर भारत गॅस आणि एच.पी. असे दोन गॅस कनेक्शन होते. आधार लिकिंगमुळे त्यांनी सन २०१२ मध्ये आपले एच.पी.च्या गॅस सिलिंडरचे कनेक्शन बंद केले. परंतु, आता गॅस सिलिंडरचे कनेक्शन बंद केले असताना व आयडीबीआय बँकेत खाते नसताना त्रिभुवन यांच्या नावावर गॅस सिलिंडरचे अनुदान जमा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड येथील एका गॅस एजन्सीने एकाच कुटुंबात बोगस व्यक्तींच्या नावे गॅस बुकिंग करून पाच महिन्यांत एका कुटुंबाला तब्बल तीस गॅस सिलिंडर वितरित केल्याचे समोर आले. तर गॅस सिलिंडरची नोंदणी केली नसताना नियमित गॅस न घेणाऱ्या ग्राहकांच्या नावावर परस्पर गॅस नोंदणी करून घरगुती वापराचा गॅस सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना काळ्याबाजाराने विक्री करणाऱ्या सांगवी येथील वंदना भारत गॅस एजन्सीचा बोगस कारभार ‘लोकमत’ने समोर आणला आहे.