पुण्यातील तळजाईच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 09:44 IST2022-05-25T09:44:31+5:302022-05-25T09:44:44+5:30
पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत...

पुण्यातील तळजाईच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
धनकवडी (पुणे) : पुणे शहरातील तळजाईच्या जंगलात मंगळवारी (दि. २४ मे) दुपारी झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या मृतावस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
तळजाईच्या जंगलात मंगळवारी दुपारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती तत्काळ एका नागरिकाने सहकारनगरपोलिसांना दिली. सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मृत व्यक्तींने दोन तीन दिवस अगोदरच आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला असून अधिक तपास सुरू केला. मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नसल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले आहे.