पुण्यात जांभूळवाडी दरीपूलाजवळ आढळला तृतीयपंथीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:00 IST2021-11-23T13:00:37+5:302021-11-23T13:00:48+5:30
दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

पुण्यात जांभूळवाडी दरीपूलाजवळ आढळला तृतीयपंथीचा मृतदेह
धनकवडी : जांभूळवाडी रस्ता दरीपूलाजवळ इंडियन आँईल पेट्रोल पंपाच्या बाजूने पुढे गेल्यावर आज सकाळी एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळला. सागर उर्फ सारिका उजागरे, (वय २५ वर्षे, रा. माडा काँलनी, हडपसर) असे तृतीयपंथीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी फिरायला (माँर्निंगवाँक) ला जाणाऱ्या नागरिकाने पोलीस कंट्रोलला फोन केल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह दगडावर पडलेला दिसला. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनेचा शोध पोलीस पथक घेत आहेत.