खडकी रेल्वे स्टेशन परिसरात आढळला ३ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:25 IST2023-03-06T17:20:13+5:302023-03-06T17:25:02+5:30

नैतिक संबंधात अडसर नको, म्हणून त्यांनी हे कृत्य केले....

Body of 3-year-old child found in Khadki railway station area; From an immoral relationship | खडकी रेल्वे स्टेशन परिसरात आढळला ३ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

खडकी रेल्वे स्टेशन परिसरात आढळला ३ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

पुणे : तीन वर्षांच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह फेकून देऊन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ आणि खडकी पोलिसांनी यश आले आहे. पाेलिसांनी याप्रकरणी दोघांना रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. आई व बापानेच या मुलीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधात अडसर नको, म्हणून त्यांनी हे कृत्य केले.

संतोष देवमन जामनिक (वय २५) आणि लक्ष्मी संतोष गवळी (रा. खिरपुडी, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजाराकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला एका चिकूच्या झाडाजवळ एका साधारण ३ वर्षांच्या मुलीचा मृतदेह २ मार्च रोजी दुपारी आढळून आला होता.

मुलीचा गळा दाबून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या परिसरात सीसीटीव्ही नव्हते. पुणे-मुंबई रोड व एका दुकानातील सीसीटीव्ही तसेच खडकी रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्हीचा मागोवा घेत तांत्रिक विश्लेषण करून अकोल्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्या आधारे दोघांना पुण्यात ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Body of 3-year-old child found in Khadki railway station area; From an immoral relationship