जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:36 IST2025-06-24T11:34:30+5:302025-06-24T11:36:47+5:30

Junnar: जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकडा परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

Bodies of young men found in Konkankade, Junnar; Suicide suspected, stir in the area | जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ

जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकडा परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे १२०० फूट खोल दरीत एक पुरुष आणि एक महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळून आला असून, ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृतांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन युवती रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे २०-२२) यांचा समावेश आहे. याबाबत माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. दोघे काही दिवसांपासून बेपत्ता होते. रामचंद्र पारधी यांच्या बेपत्तापणाबाबत त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, तर रूपालीच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.

दुर्गावाडी परिसरात कोकणकड्याजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला. शोध घेतला असता कड्याच्या टोकावर पुरुष व स्त्रीच्या चपला आढळल्या. विवार, २२ जून रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र सोमवारी २३ जून रोजी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. जुन्नर पोलिस व रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीव धोक्यात घालून १२०० फूट खोल दरीत उतरून शोध घेतला. अखेर त्यांना दोघांचे मृतदेह आढळून आले आणि ते बाहेर काढण्यात आले.

शवविच्छेदनासाठी मृतदेह श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. संतोष पारधे यांना गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामासाठी पाठवले होते. त्यानंतर कामावर येत नव्हते. आणि नंतर त्यांनी एका तरुण मुलीसह आत्महत्या केली या आत्महत्येचे खरे कारण समजले नाही. मात्र अनैतिक संबंधातून जीवनयात्रा संपवली हे दिसत आहे.

Web Title: Bodies of young men found in Konkankade, Junnar; Suicide suspected, stir in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.