राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:57+5:302021-02-05T05:02:57+5:30

यावेळी आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी अधिकारी ...

Blood donation camp at State Family Welfare Office | राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात रक्तदान शिबिर

राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात रक्तदान शिबिर

यावेळी आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. या वेळी एकूण ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व कार्यालयांच्या सहभागाने शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

या वेळी रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, हितचिंतक व वर्ग-४ कर्मचारी यांनी योगदान दिले. रक्त संकलनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालय औंध येथील ब्लड बँकेच्या पथकाने केले. यामध्ये डॉ. प्राची जाधव, रक्त संक्रमण अधिकारी, श्रीमती प्रियंका माने, मनीषा काळे, रक्तपेढी तंत्रज्ञ, तसेच अन्य कर्मचारी यांनी योगदान दिले.

Web Title: Blood donation camp at State Family Welfare Office