शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरगड पायरीमार्गावर ब्लँकेटवाटप

By admin | Updated: January 25, 2017 01:32 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडकोट पायरी मार्गावरील गोरगरीब भिक्षुकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडकोट पायरी मार्गावरील गोरगरीब भिक्षुकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. मेघमल्हार प्रतिष्ठान जेजुरी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला.सध्या उत्तर भारताकडून थंडीची लाट आली आहे. खंडोबागडाच्या पायरी मार्गावर अनाथ, अपंग भिक्षुकांची संख्या लक्षणीय आहे. दिवसभर भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणारे भिक्षुक रात्रीच्या वेळी गडकोट मार्गावर असणाऱ्या ओवऱ्या, वेशी दीपमाळांचा आश्रय घेतात. रात्रीच्या वेळी थंडीत कुडकुडणाऱ्या अनाथ अपंगांना मेघमल्हार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. २०) रात्री सुमारे शंभर ब्लँकेटचे वाटप जेजुरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिनशेठ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या वतीने दरवर्षी गोरगरिबांना कपडे, ब्लँकेटवाटप करण्यात येते. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी मुंबईस्थित मल्हारभक्त डॉ. माया सातवळेकर व दीपक सातवळेकर यांचे सहकार्य लाभले. राहुल मंगवाणी, सचिन उपाध्ये, राहुल वीर, विशाल भोसले, रियाज पानसरे, महेश शिंदे आदींनी हा उपक्रम राबविला.(वार्ताहर)