शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:04 IST

मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट घेतले. त्यांना निवडून आणले. मात्र, त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही

पुणे: महापालिकेची प्रभाग रचना २००७ पूर्वीही अशाच प्रकारे विश्वासात न घेता केली जात होती, तरीही आपण सत्तेवर आलो. त्यामुळे महापालिकेसाठी प्रभाग रचना अशी केली, तशी केली, याचा विचार न करता, महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना व माजी नगरसेवकांना केल्या.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली आहे. रस्ते व नैसर्गिक सीमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप भाजप सोडून सर्वच पक्षांकडून केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, दोन्ही शहराध्यक्षांसह पदाधिकारी व माजी नगरसेवकांची शनिवारी व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये बैठक घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सत्तेत असतानाही भाजपने प्रभाग रचना करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. एका प्रभागात आपलेच उमेदवार समोरासमोर येतील, अशा पद्धतीने रस्ते व नैसर्गिक सीमांचे उल्लंघन करून प्रभाग तयार करण्यात आल्याच्या तक्रारी यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या.अशा पद्धतीने प्रभाग फोडण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचा आरोपही काहींनी केला. यावर अजित पवार म्हणाले, महायुतीमध्ये असल्याने प्रभाग रचना करताना आम्हाला विश्वासात घ्या, असे मी मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तशा सूचना शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, मोहोळ यांनी मी साहेबांशी (मुख्यमंत्र्यांशी) बोलतो, तुम्ही आपल्या पद्धतीने प्रभाग रचना करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट घेतले. त्यांना निवडून आणले. मात्र, त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही. यापूर्वी सुरेश कलमाडीही असेच करीत होते. मात्र, तरीही आपण सत्तेवर आलोच. तेच झाले आहे. भाजप महापालिकेत स्वबळावर सत्तेवर येण्याची तयारी करीत आहे. तुम्ही चार-पाच वर्षांत काय काम केले, हे मतदार पाहात नाहीत. तुम्ही दोन-तीन महिन्यांत काय काम केले, हे बघतात. त्यामुळे तुम्ही प्रभाग रचनेचा विचार न करता कामाला लागा, स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या. बैठकीला उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

वरिष्ठ पातळीवर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू

पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेसंदर्भात सूचना मांडल्या. विशेष करून, समाविष्ट ३२ गावांमध्ये ज्या प्रकारे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे, त्याची शहानिशा व्हावी. अनेक जणांनी नैसर्गिक सीमा प्रभाग रचनेत गृहीत धरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी करण्यात आलेली रचना जवळपास कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तेथे फार तक्रारी नाहीत. मात्र, पुण्यात वेगळी परिस्थिती आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असी माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmurlidhar moholमुरलीधर मोहोळPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका