पुण्यात भाजपच्या सर्वेक्षणाने ' हे ' विद्यमान आमदार आहे '' डेंजर झोन ''मध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 19:58 IST2019-05-29T19:47:17+5:302019-05-29T19:58:23+5:30
नव्या चेहऱ्यांचा फार्म्युला विधानसभेलाही वापरला तर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे...

पुण्यात भाजपच्या सर्वेक्षणाने ' हे ' विद्यमान आमदार आहे '' डेंजर झोन ''मध्ये ?
पुणे: भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या आधी केलेल्या पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघ सर्वेक्षणामुळे काही ठिकाणचे विद्यमान आमदार धास्तावले आहेत. पक्षाने लोकसभा निवडणुकीत वापरलेला नव्या चेहऱ्यांचा फार्म्युला विधानसभेलाही वापरला तर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मतदारसंघ मोकळा होण्याची शक्यता गृहीत धरुन संधी तेथील इच्छुकांनी जनसंपर्क, जाहीर कार्यक्रम यातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणूकीत विद्यमान आमदारांमध्ये गिरीश बापट यांना मताधिक्य मिळवून देण्याची चुरस लागली होती. विधानसभेची उमेदवारी बळकट करण्याचा हेतू त्यामागे होता. त्याआधी पक्षाच्या प्रदेश शाखेने केलेल्या सर्वेक्षणाच्या चर्चेचा संदर्भही यामागे होता. या सर्वेक्षणात तीन जागा ‘डेंजर झोन’मध्ये दाखवण्यात आल्याची चर्चा होती.
लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाने पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता गिरीश बापट यांना दिली. शिरोळे यांना उमेदवारी न देण्यामागेही जनसंपर्कचा अभाव हेच कारण असल्याचे सांगण्यात येते. तोच निकष विधानसभेला लावला जाण्याची भीती पुण्यातील आमदारांमध्ये आहे.
खासदार बापट प्रतिनिधित्व करत असलेला कसबा मतदारसंघ आता ते खासदार झाल्यामुळे मोकळा होणार आहे.