शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 12:04 IST

भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली

ठळक मुद्देकाँग्रेसच्या विनामूल्य छत्री दुरूस्तीची समाजमाध्यमांवर बरीच टर ऊडवली गेली. ७० वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता भाजपाची काही धडगत नाही अशा आशयाच्या पोस्ट केल्या गेल्या

पुणे: काँग्रेस भवनमध्ये शहर काँग्रेसने सुरू केलेल्या विनामूल्य छत्री दुरूस्ती ऊपक्रमावरून बरीच राजकीय चेष्टा झाली. पण या केंद्रात आज भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली. 

काँग्रेसच्या विनामूल्य छत्री दुरूस्तीची समाजमाध्यमांवर बरीच टर ऊडवली गेली. ७० वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता भाजपाची काही धडगत नाही अशा आशयाच्या पोस्ट केल्या गेल्या. त्यात अर्थातच भाजप समर्थक आघाडीवर होते. 

पण आज या केंद्रात एका नागरिकाने चक्क भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली एक छत्री आणून दिली. तिची रंगसंगती भाजपाच्या झेंड्याप्रमाणे आहे. त्यावर कमळाचे चिन्हही आहे. नाईक नावाच्या शनिवारपेठेतील  एका आजोबांनी ती आणून दिली व दुरूस्त करून मागितली. छत्री दुरूस्त करणारे रोहिदास कांबळे यांनी सांगितले की तिच्या काड्या तुटल्यात. कापड साधे असल्याने विरले आहे. बहुधा ती वाटपातील असावी. मी ती दुरूस्त करून देणार आहे. काँग्रेसचे सोशल मिडिया आघाडीचे चैतन्य पुरंदरे यांनी हा क्षण बरोबर आपल्या मोबाईलमध्ये टिपला.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसRainपाऊसgirish bapatगिरीष बापटMohan Joshiमोहन जोशी