शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीपुढे बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 2:08 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देआज माघारीचा दिवस : सर्वपक्षीय नेत्यांचे माघारीसाठी शर्थींचे प्रयत्न 

पिंपरी : उद्योगनगरीतील मावळ, पिंपरी, चिंचवड व भोसरी या चारही मतदारसंघात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात इच्छुकांनी बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. मावळात भाजपाला बंडखोरी मागे घेण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे आव्हान कायम आहे.  चिंचवड मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पिंपरीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांच्या विरोधात स्वकीयांसह काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चारही मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी शनिवारी झाली. या वेळी १५ अर्ज अवैध ठरले असून, त्यामध्ये चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे व पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर- शीलवंत यांचा अर्ज एबी फॉर्मच्या गोंधळामुळे रद्द झाला आहे. मात्र, पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी बदलून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना दिली. त्यामुळे सुलक्षणा धर शिलवंत यांच्यासह माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी बंडखोरीचे अपक्ष अर्ज कायम ठेवले आहेत. त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत आहेत. तसेच, पिंपरीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपाचे पदाधिकारी व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज कायम ठेवले आहेत. त्यांचे अर्ज मागे घेण्याचे आव्हान युतीच्या नेत्यांपुढे आहे. मावळ मतदारसंघात भाजपाचे उमेदवारांविरोधात युवा मोर्चाचे नेते रवींद्र भेगडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, भाजपातून बंडखोरी करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुनील शेळके यांच्या विरोधात नाराजी आहे.  राष्ट्रवादीचे निष्ठावंत बाळासाहेब नेवाळे व नगरसेवक किशोर भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तरी पक्षाला आपली ताकद दाखवून देण्याचे आव्हान दिले आहे.इतके दिवस आम्ही राष्ट्रवादीसाठी एकनिष्ठपणे व प्रमाणिकपणे काम केले. विधानसभा निवडणुकीची तयारी केली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आयात उमेदवार उमेदवाराला संधी दिल्याने मावळातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते व कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका सुनील शेळके यांना बसू शकतो. त्यामुळे या नाराजांची समजूत काढून त्यांना सक्रिय करण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आहे. ...........

लक्ष्मण जगताप यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादीची पुरस्कृत राहुल‘नीती’?चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज एबी फॉर्मच्या गोंधळामुळे अवैध ठरला. त्यामुळे चिंचवडमधील भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु, युतीमध्ये बंडखोरी करून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. अर्जाच्या छाननीतही कलाटे यांचा अर्ज वैध ठरला आहे. सध्या राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार चिंचवडच्या रिंगणात राहणार नाही. त्यामुळे आमदार जगताप यांना घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना पुरस्कृत करण्याची खेळी खेळली जाण्याची चर्चा आहे. तसे झाले, तर आमदार जगताप यांच्यापुढे राहुल कलाटे यांचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. शिवाय भाजपाच्या उमेदवाराविरोधात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते कलाटे यांना पाठिंबा देणार असल्याचे चर्चा आहे. .........

 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण