शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारण प्रकल्पास भाजपाचा विरोध

By admin | Updated: August 24, 2015 03:07 IST

कँटोन्मेंट बोर्डाकडून बांधण्यात येणाऱ्या बहुचर्चित पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा उद्या भूमिपूजन समारंभ होणार आहे. मात्र ऐनवेळी या प्रकल्पाला सत्ताधारी

मलनिस्सारण प्रकल्पास भाजपाचा विरोधपुणे : कँटोन्मेंट बोर्डाकडून बांधण्यात येणाऱ्या बहुचर्चित पहिल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा उद्या भूमिपूजन समारंभ होणार आहे. मात्र ऐनवेळी या प्रकल्पाला सत्ताधारी भाजपाच्या पक्ष पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध झाला आहे. प्रकल्पाच्या नियोजित जागेवरील शाळा स्थलांतरित करण्यास विरोध असून, नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याची मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली आहे.बुट्टी स्ट्रीट येथे उभारल्या जाणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ उद्या (दि. २४) सकाळी दहा वाजता आयोजिण्यात आला आहे. डिफेन्स इस्टेटचे महासंचालक रविकांत चोप्रा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, डिफेन्स इस्टेटचे प्रिन्सिपल डायरेक्टर जोगेश्वर शर्मा, बोर्डाचे अध्यक्ष ए. के. त्यागी आदी उपस्थित राहणार आहेत. रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल या प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवर आहे. शाळेचे स्थलांतर बाबाजान चौकातील बोर्डाच्या गोडाऊनच्या जागेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही शाळा स्थलांतरित करण्यास भाजपाच्या कामगार आघाडीचे माजी शहराध्यक्ष शशिधर पूरम आणि कँटोन्मेंट बोर्ड विभागाचे माजी सरचिटणीस विनायक काटकर यांनी विरोध केला आहे.सध्या या शाळेमध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे. बाबाजान चौकात शाळा स्थलांतरित केल्यानंतर या परिसरातील विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. तसेच पुढील जून महिन्यात होणाऱ्या शैक्षणिक वर्षापर्यंत इमारतीचे बांधकाम होणे शक्य नाही, कारण त्यासाठी बोर्डाकडे निधी नाही. तरीही बोर्डाकडून घाई करण्यात येत असल्याचा पूरम आणि काटकर यांचा दावा आहे. या प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. हा प्रश्न अद्याप सोडविण्यात आलेला नसताना भूमिपूजन समारंभ घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.