शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 9:30 AM

‘तो’ मी नसल्याचा आमदाराचा दावा

ठळक मुद्दे‘तो’ मी नसल्याचा आमदाराचा दावा

पुणेे : भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. मोबाइलवरून शिवीगाळीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, भाजपवर चौफेर टीका होऊ लागली आहे. तथापि, ही ऑडिओ क्लिप खोटी व बनावट असून, त्यातील आवाज आपला नसल्याचा दावा आमदार कांबळे यांनी केला आहे.

संबंधित महिला अधिकारी महापालिकेच्या ड्रेनेज विभागात वरिष्ठ पदावर आहेत. एका कामासंदर्भात कांबळे यांनी कार्यकर्त्याच्या मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणत धमकावले व शिवीगाळ केली. या वेळी संबंधित महिलेने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी अगदीच खालच्या स्तरावर जाऊन शिवीगाळ केली. हे सहन न झाल्याने महिलेने फोन कार्यकर्त्याच्या हातात दिला. त्यावर कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पीकरवर टाकायला सांगून पुन्हा शिवीगाळ केली. तसेच काही पुरुष अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ करीत धमकावले. या संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. 

सुनील कांबळे तुम्ही आमदारांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत. तुम्हाला पुण्यातील महिलावर्ग सोडणार नाही, असा इशारा मनसेच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMLAआमदार