चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज, रुपाली ठोंबरेंची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 06:26 IST2022-10-21T06:26:03+5:302022-10-21T06:26:33+5:30
बावनकुळे यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू असं वक्तव्य केलं होतं.

चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज, रुपाली ठोंबरेंची जोरदार टीका
खेडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू असं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीकेचा बाण सोडत त्यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं.
"भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोणीतरी उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा. सातत्याने त्यांना घड्याळ बंद पाडू, महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही, हे त्यांचं झटक्याचं जे लक्षण आहे त्यावर त्वरित उपचाराची गरज आहे," असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचली पाहिजे, दिवाळीच्या मुहुर्तावर अन्नधान्याचे किट मिळाले पाहिजे असे प्रश्न न सोडवता, त्यांना जे सातत्याने झटके येतायत त्वार उपचार होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. २०२४ मध्ये राष्ट्रवादी अर्धीही राहणार नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला होता.