शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

पुणे महानगरपालिकेच्या ‘दांडी’बहाद्दर २७ नगरसेवकांना भाजपाने धाडल्या नोटीसा; मागविले खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 18:47 IST

सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणे भोवले...

पुणे : ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या  27 नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. हे सर्व नगरसेवक भाजपाचेच असून गैरहजर राहण्यामागील कारणांचा खुलासा करावा असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेची खास सभा तसेच पर्यावरणाची तहकूब सभा गुरूवारी (दि. १८) आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित राहावे यासाठी नगरसचिव कार्यालयाच्या वतीने टपाला द्वारे कार्यपत्रिका पाठविण्यात आली होती. तसेच सभागृह नेता कार्यालयामार्फत प्रत्येक नगरसेवकाला फोन करून सभेला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले होते. परंतु, २७ सभासदांनी  ‘दांडी’ मारली. वारंवार आठवण करूनही अनुपस्थित राहिलेल्या या सर्व सभासदांना नोटीस बजावित सभागृह नेता गणेश बीडकर यांनी खुलासा मागितला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांच्यासह सभागृह नेता कार्यालयाकडे हा खुलासा द्यावा, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून सर्वसाधारण सभा न झाल्याने ३०० हून अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या नगरसेवकांचा याला विरोध असतानाही भाजपने ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अधिकाधिक विकासकामे होणे हे भाजपाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या विकासकामांच्या विषयांना सर्वसाधारणसभेची मान्यता आवश्यक आहे.विरोधी पक्षांकडून विषयांना विरोध झाल्यास बहुमताच्या जोरावर विषय मान्य करावे लागतात. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सभासदाने हजर राहावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये देखील मार्गदर्शन करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सभागृहात हजर राहत नागरिकांच्या हितासाठी कसे प्रश्न उपस्थित करायचे, याचे मार्गदर्शन केले होते. तरीदेखील नगरसेवक गैरहजर राहात असल्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे.====  ‘दांडी’ बहाद्दरांमध्ये पदाधिकारीच अधिकसभेला दांडी मारणा-यांमध्ये पदाधिकारीच अधिक असून विविध महत्वाच्या समित्यांवर सदस्य, अध्यक्ष तसेच स्थायी समितीमध्ये काम करणारे आजी, माजी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील सर्वात अधिक सभासदांनी या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली.====पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. पालिका आयुक्तांनी मिळकत करात सुचविलेली वाढ फेटाळून पुणेकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी खास सभा बोलाविण्यात आली होती. पक्षाच्या शिस्तीचे पालन न केलेल्या २७ सभासदांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.- गणेश बीडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाMNSमनसेPoliticsराजकारण