भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अॅड .प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 18:51 IST2019-06-21T18:51:32+5:302019-06-21T18:51:54+5:30
वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेत प्रवेश करणार आहे.

भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अॅड .प्रकाश आंबेडकर
पुणे : भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार हे लोकांनी निवडून दिलेले नाही तर ईव्हीएम मशिनमुळे निवडून आल्याचा गंभीर आरोप वंचित आघाडीचे नेते अॅड..प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे .
पुणे महापालिका प्रभाग क्र.१च्या पोटनिवडणुकीच्या निमित्त वंचितच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले ,ज्येष्ठ नेते वसंत साळवे ,महिला अध्यक्ष अनिता चव्हाण ,संतोष संखद उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करू देणार नाही. तसेच वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेत प्रवेश करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.