पुणे : महाराष्ट्राची ओळख ही शिवछत्रपतींची, स्वराज्य जन्मसिद्ध अधिकार सांगणाऱ्या लोकमान्यांची आणि समतेचा आग्रह धरणाऱ्या आंबेडकरांची ' भूमी ' म्हणून आहे.पण राज्यातील राजकारणाची अवस्था आजतागायत ही संगीतखुर्चीप्रमाणे झाली होती. मात्र, २०१४ साली सत्ता स्थापन केलेल्या भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणाची संगीतखुर्ची फेम प्रतिमा बदलत संपूर्ण पाच वर्ष स्थिर सरकार दिले., असे मत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नड्ड बोलत होते. ते म्हणाले, सौभाग्य आहे की ते राष्ट्रभक्तांच्या टोळीत राहून देशासाठी लढत आहेत. निवडणुकीत कुठून लढायचे यालाही भाग्य लागते. भाजपा कार्यकर्त्यांना ते मिळाले आहे. एकीकडे मोदींनी जागतिक पातळीवर नेतृत्व स्थापने केले आहे तर दुसरीकडे त्यांचे नेते जेल आणि चौकशीच्या कचाट्याच सापडले आहे. भाजपाची सदस्य संख्या 17 कोटी इतकी आहे . पूर आला पण महाराष्ट्र भाजप सदस्य संख्येत कमी झाली नाही. ही ताकद कार्यकर्त्यांची आहे. तसेच देशात 2300 पक्ष अस्तित्वात असून त्यात 59 प्रादेशिक, 7 राष्ट्रीय आहे. पण त्यामध्ये फक्त भाजपा प्रजातांत्रिक पक्ष असून बाकीचे सगळे पारिवारिक, चाचा भतिजा पार्टी आहे. भाजपाच्या ऐकाही नेत्याला राजकीय पार्श्वभूमी नाही लौकशाही पार्टी आहे
महाराष्ट्राच्या राजकारणाची ' संगीतखुर्ची' प्रतिमा भाजपाने बदलली : जे.पी. नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:12 IST
एकीकडे मोदींनी जागतिक पातळीवर नेतृत्व स्थापन केले आहे तर दुसरीकडे 'त्यांचे' नेते जेल आणि चौकशीच्या कचाट्याच सापडले आहे..
महाराष्ट्राच्या राजकारणाची ' संगीतखुर्ची' प्रतिमा भाजपाने बदलली : जे.पी. नड्डा
ठळक मुद्देपुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित निवडणुकीत कुठून लढायचे यालाही भाग्य लागते.