कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख महिलांना वाटल्या साड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 15:57 IST2019-10-29T15:53:38+5:302019-10-29T15:57:31+5:30
भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांना एक लाख साड्यांचे वाटप करण्यात आले होते.

कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख महिलांना वाटल्या साड्या
भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांना एक लाख साड्यांचे वाटप करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटपाची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर सोपवली होती. त्यानूसार सोमवारी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डबेवाले आणि घरकाम करणाऱ्यांना फराळ दिला. त्यानूसार मी देखील साड्या वाटप सारख्या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच हे सर्व निवडणुका किंवा मतांसाठी नसून हा पंतप्रधान मोदींचा संदेश असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे घरी धुणीभांडी करणाऱ्या महिलांना नागरिकांनी साडी देण्याचे आवाहान देखील त्यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्यांच्या बाँक्सवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहून भाजपा पक्षाचं चिन्ह कमळ व चंद्रकांत पाटील यांचा फोटो देखील छापण्यात आला होता. यावर मनसेने मात्र आक्रमक पवित्रा घेत हा आचारसंहितेचा भंग असून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.