इंदापूर : राज्यात आज एक महिन्याच्या कालावधीत नंतर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर इंदापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून, फटाके वाजवून स्वागत केले. आणि इंदापूर बाजारपेठेत शेतकरी आणि व्यापारी वर्गाला साखर वाटून त्यांचे गोड केले. इंदापूर शहरातील जुन्या कोर्टापासून खडकपुरा पर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून जल्लोष केला आणि भारतीय जनता पाटीर्चा विजय असो अशा घोषणा केल्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली वाघमोडे, चांदभाई पठाण, मेहबुब मोमीन, दिनेश जाधव, मुन्नाभाई बागवान, अशोक जाधव, सागर भोंग, गणेश पांढरे, तुकाराम जाधव, दिलीप शिंदे, सिकंदर बागवान आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. _______________
इंदापूरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:34 IST
इंदापूर शहरातील जुन्या कोर्टापासून खडकपुरापर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून जल्लोष केला
इंदापूरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
ठळक मुद्देइंदापूर बाजारपेठेत शेतकरी आणि व्यापारी वर्गाला साखर वाटप