Video: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार तर चार जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:43 PM2021-10-21T17:43:33+5:302021-10-21T18:02:49+5:30

धायरी : मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू ...

bizarre accident near navale bridge pune 2 death 4 seriously injured | Video: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार तर चार जण गंभीर

Video: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार तर चार जण गंभीर

Next

धायरी: मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास घडली. 

सातारा दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना त्याची धडक बसली. कंटेनरने पिकअपला धडक दिल्यानंतर न थांबता पुढील दोन-तीन वाहनांना धडक दिली. जखमींना नऱ्हे गावाचे उपसरपंच सागर भूमकर, डॉ. एन बी आहेर व कार्यकर्त्यांनी  उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. 

परिसरात घडतात नेहमीच अपघात.... 
नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Web Title: bizarre accident near navale bridge pune 2 death 4 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app