VIDEO | पुण्यात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 14:35 IST2022-04-19T14:27:11+5:302022-04-19T14:35:05+5:30
भररस्त्यात कोयत्याने कापला केक

VIDEO | पुण्यात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणाऱ्यांना अटक
पुणे : मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. वीरेंद्र बाजीराव सस्ते (वय १८), शशांक श्रीकांत नागवेकर (वय १९), समीर विश्वजीत खंडाळे (वय २१, तिघे रा. केशवनगर, मुंढवा), सुखविंदरसिंग पप्पूसिंग टाक (वय १९, रा. हडपसर, गाडीतळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस कर्मचारी रमेश उगले यांनी यासंदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वीरेंद्र सस्ते याने त्याच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमावर समूह तयार केला आहे. सस्ते आणि त्याचे साथीदार केशवनगर भागातील राजमाता जिजाऊ चौकात सायंकाळी जमले. सस्ते आणि साथीदारांनी भरस्त्यात केक कोयत्याने कापून दहशत माजविली.
पुण्यात कोयत्याने कापला केक, व्हिडीओ व्हायरल#pune#crimepic.twitter.com/8ePv8XTvW6
— Lokmat (@lokmat) April 19, 2022
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले असून, पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे तपास करीत आहेत.