शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच बिल

By admin | Updated: March 24, 2015 23:19 IST

जिल्हा परिषद शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच वीजबिल आकारले जाते, असे महावितरणने आज स्पष्ट केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्यात येतो; त्या

पुणे : जिल्हा परिषद शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच वीजबिल आकारले जाते, असे महावितरणने आज स्पष्ट केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्यात येतो; त्यामुळे प्राथमिक शाळांची वीज देयके भरणे कठीण होते. पर्यायाने वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्य अभियंता वाडेकर यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांची बैठक झाली. बैठकीला शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, महावितरणचे सदस्य प्रवीण शिंदे, बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता इरवाडकर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वरील प्र्रश्न महावितरणकडे मांडला असता वाडेकर यांनी, सर्व शिक्षणसंस्था या सार्वजनिक सेवा प्रकारामध्ये येत असल्यामुळे त्यांना सार्वजनिक सेवा दरानुसारच आॅगस्ट २०१२पासून आकरणी करण्यात येत आहे. ज्या शाळांना अजूनही व्यापारी सेवा दराप्रमाणे वीज देयके येत असतील, त्यांनी त्यांचे नजीकचे बिल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये घेऊन संपर्क साधावा. तसे आढळ्ल्यास सार्वजनिक सेवा दरानुसार वीज देयक आकारणी तत्काळ करून देण्यात येईल. आॅगस्ट २०१२पासून त्यांनी जादा रक्कम भरली असेल, ती पुढील देयकांमध्ये समायोजित करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा परिषद शाळांमधील वीज देयके सार्वजनिक सेवा दरानुसार येत आहेत किंवा नाही याची खात्री करा, अशा सूचना शुक्राचार्य वांजळे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. (प्रतिनिधी)असे आकारले जातात दर घरगुती वीज आकारणी - (एलटी -१) - ४ रू.०७ पैै.व्यावसायिक वीजआकारणी - (एलटी -२) - ७ रू.१३ पैै.सार्वजनिक सेवा - (एलटी -१0) - ६ रू.३७ पैै.