Pune: धायरीत भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:31 IST2024-04-13T13:30:36+5:302024-04-13T13:31:01+5:30
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे-धायरी रस्त्यावर घडली आहे...

Pune: धायरीत भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक पसार
पुणे : पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे-धायरी रस्त्यावर घडली आहे. नयन आदेश मारणे (वय २०, रा.धायरी फाटा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत युवराज मारणे (वय ३९) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार नयन मारणे गुरुवारी (दि. ११) दुपारी पावणेएकच्या सुमारास धायरी रस्त्यावरील डी मार्टसमोरून निघाला होता. त्यावेळी भरधाव टँकरने त्याच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या नयनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक तेथून पसार झाला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव याबाबत पुढील तपास करत आहेत.