टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तळेगाव-चाकण रस्त्यावर भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 11:10 IST2023-08-02T11:09:37+5:302023-08-02T11:10:42+5:30

इंदोरी गावात २५ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली...

Bike rider dies in collision with tempo; Fatal accident on Talegaon-Chakan road | टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तळेगाव-चाकण रस्त्यावर भीषण अपघात

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तळेगाव-चाकण रस्त्यावर भीषण अपघात

पिंपरी : भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तळेगाव-चाकण रस्त्यावर इंदोरी गावात २५ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

सुरेश होनाजी दाभाडे (वय २९, रा. इंदोरी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गीताराम कल्याण सोनवणे (वय ३५, रा. इंदोरी, ता. मावळ) हे जखमी झाले. याप्रकरणी अरुण मधुकर दाभाडे (वय ३०, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Bike rider dies in collision with tempo; Fatal accident on Talegaon-Chakan road